January 22, 2025

गेवराई तालुक्यात अतिवृष्टी;गोदा काठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा

गेवराईच्या दहा महसूली मंडळात जोरदार पाऊस तहसिलदार खोमणे 

गेवराई दि 2 ( वार्ताहार ) तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासून सतत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तसेच जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येईल तसेच गोदाकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे असे अवाहन गेवराई महसूलचे प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे.

याबाबद सविस्तर माहिती की, तालुक्यातील गेवराई 124 .0एमएम,मादळमोही 116.3एमएम,जातेगाव 140.5एमएम,धोडराई 147.5एमएम,पाचेगाव 91.3एमएम,उमापूर 131.0 एमएम,चकलांबा 90.0एमएम,शिरसदेवी 118.0एमएम,,रेवकी 171.5 एमएमतलवाडा 130.3एमएम येवढी पावसांची नोंद आज पर्यंत झाली आहे तसेच गोदाकाठच्या परिसरातील गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तसेच जायकवाडी धरणातील पाणी साठ्याची आवक वाढली आहे यामुळे कोणत्याही क्षणी पाण्याचा विसग्र होऊ शकतो तसेच आपत कालिन परिस्थितीत गावातील तलाठी,मंडळ,वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन देखील तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *