राक्षसभूवन वाळू उत्खनन प्रकरणी पाच वेगवेगळे गून्हे दाखल
पहिल्यादांच पाच गून्हे मात्र आरोपी आज्ञात
गेवराई दि 29 ( वार्ताहार ) राक्षसभूवन प्रकरणी काल बीड स्थानिक गून्हे शाखेने मोठ्या शिताफीने गोदापात्रात कार्यवाई केली परंतू या कार्यवाईत सुरूवातीला दहा ट्रॅक्टर पकडले आहेत अशी माहिती रेड पथकातील कर्मचारी याने दिली परंतू पाच वाहने चकलांबा पोलिसांत लावण्यात आली तसेच अनेक गून्ह्याचा परदाफाश करणारी स्थानिक गून्हे शाखा म्हणून बीड च्या टीमचे नाव राज्यात नावलौकिक आहे पण स्थानिक गून्हे शाखेने कार्यवाई केली पण यामध्ये संशयाचा धूर येऊ लागला आहे.तसेच या प्रकरणी पाच वेगवेगळे गून्हे चकलांंबा पोलिसांत दाखल झाले आहेत.
या बाबद सविस्तर माहिती अशी अशी की,बीड जिल्ह्यात अवैध धंद्या वाल्याची मोठी धांदल उडाली आहे त्यातच वाळू माफिया विरूद्ध बीड पोलिस अधीक्षक यांनी कार्यवाईचा फास आवळला आहे तसेच अनेक वाळू माफियांच्या झोप उडाली आहे ही ईतिहासात प्रथमच झाले आहे परंतू वाहतूक शाखा असो किंवा बीड स्थानिक गून्हे शाखा किंवा जिल्हात गेवराईचे तिनही ठाण्याचे ठाणेदार असो यांना वाळू व अवैध धंदे यावर सक्त कार्यवाईचे आदेश बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत त्यातच बीड स्थानिक गून्हे शाखेने राक्षसभूवन गोदापात्रात छापा टाकला यावेळी पथकातील एका कर्मचारी याने दहा ट्रॅक्टर पकडले असल्याची माहिती माध्यमांना दिली तसेच प्रत्यक्ष पाच ट्रॅक्टरवर कार्यवाई केली ते पण आरोपी आज्ञात ही घटना पोलिसांच्या हातून घडली असती तर यात नवल नव्हते परंतू स्थानिक गून्हे शाखा ही संशयास्पद कार्यवाई करू शकते हे आता स्पष्ट झाले आहे या प्रकरणी बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जातीने लक्ष घालावे व सत्य घटना समोर आनावी दोषी कर्मचारी यांच्या विरूद्ध प्रशासकीय कार्यवाई प्रस्तावित करावी अशी मागणी होऊ लागली आहे.