एस पी साहेब आता मात्र वाहतूक शाखेच्या कामगिरी वर संशय येऊ लागला
हायवात पाच ब्रास वाळू असतांना गून्हा दाखल का?
गेवराई दि 25 ( वार्ताहार ) तालुक्यात अवैध उपसा व त्यांची वाहतूक थांबता थांबत नाही तसेच बीड पोलिस अधीक्षक पदाचा कारभार अविनाश बारगळ यांनी स्विकारल्या पासून वाळू वाहतूक करनाऱ्या हायवा वर कार्यवाई करण्याची जबाबदारी ही बीड वाहतूक शाखेवर सोपविण्यात आली सुरूवातीच्या संपुर्ण हायवा यांच्या विरूद्ध दंडात्मक कार्यवाईसाठी प्रस्ताव तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले मात्र रात्री वाहतूक शाखेने एक हायवा पकडला आणि तो ताब्यात घेऊन मुख्यालयात लावला परंतू यात पाच ब्रास वाळू होती यांचा प्रस्ताव तहसिलदार यांच्याकडे पाठविणे अपेक्षीत होते परंतू गून्हा दाखल केला आणि चालक ताब्यात घेतलेला नोटीसवर सोडून दिला ही बाब काही संशयास्पद वाटत नाही का?या प्रकरणी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,काल ( दि 25 ऑगस्ट ) रोजी बीड वाहतूक शाखेचे सपोनि सुभाष सानप व त्यांची टीम गस्त घालत असतांना पाडळशिंगी टोल नाक्यावरून एक हायवा ज्यांचा क्रंमाक एम 12 एस एफ 4997 याला वाहतूक शाखेने हात करूण थांबविले व तो चालक हायवा घेऊन थांबला व त्यामध्ये पाच ब्रास वाळू होती तो कार्यवाई केलेला हायवा बीड मुख्यालयात लावला परंतू यामध्ये बीड वाहतूक शाखेने केलेल्या कामगिरीवर संशय व्यक्त होत आहे या आगोदर पकडलेल्या हायवा हे थेट दंडात्मक कार्यवाईसाठी तहसिलदार यांना पत्रव्यवहार करण्यात आले या हायवात वाळू असतांना देखील गेवराई पोलिसांत गून्हा दाखल केला परत ताब्यात घेतलेला चालक याला नोटीस देऊन सोडण्यात आले व सकाळी 7 वा मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे ही बाब अतिषय खेदजनक व संशयास्पद आहे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकरणी लक्ष घालून बीड वाहतूक शाखेला आपल्या कर्तव्याची जाणिव करूण द्यावी अशी मागणी जनसामान्यातून होऊ लागली आहे.