ड्रोन बाबत योग्य तो खूलासा पोलिस प्रशासनाने करावा

मा आ अमरसिंह पंडित यांची पोलिस प्रशासनाकडे मागणी

गेवराई दि 24 ( वार्ताहार ) तालुक्यातील बऱ्याच गावांत रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत आहेत तसेच परिसराच चोरीचे देखील प्रमाण वाढले आहेत या बाबद पोलिस प्रशासनाकडे कसलीही माहिती नाही तसेच योग्य तो अधीकृत खूलासा पोलिस प्रशासनाने करावी अशी मागणी मा आ अमरसिंह पंडित यांनी उप विभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्याकडे केली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील उमापूर, चकलांबा, पाचेगांव, तलवाडा यासह इतर महसुल मंडळात विशेषतः ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे जनतेमध्ये भिती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. उमापूर, बोरीपिंपळगांव, महारटाकळी सारख्या गावामध्ये तर भर दुपारी चोरांनी घरफोड्या केल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत. राक्षसभुवन, गुंतेगांव, पाथरवाला या भागातही रात्रीच्यावेळी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी येत आहेत. पाचेगांव आणि परिसरातील तांडे व सिंफफणा नदी काठावरील गावांमध्ये सुद्धा चाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे. एकंदरीतच तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये भिती आणि दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.

चोरींच्या घटनांबरोबरच रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या संशयास्पद ड्रोनमुळे ग्रामीण भागातील लोक भितीयुक्त चिंता व्यक्त करत आहेत. गोदावरी काठासह आता सिंदफणेच्या काठावरील गावांमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळी ड्रोन संशयास्पद रितीने घिरट्या मारतांना दिसत आहे. अनेक ग्रामस्थांनी या ड्रोनच्या हलचालीचे चित्रीकरण करून पोलीसांना पाठविले आहे परंतू पोलीस प्रशासनाकडुन या बाबतचा खुलासा होत नाही. ड्रोन बाबतचा संभ्रम नागरीकांच्या मनातुन काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यातील सर्व पोलीसठाण्यांच्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण, चोरांना शोधण्यात पोलीसांना आलेले अपयश आणि ड्रोन बाबत निर्माण झालेला संशय या संदर्भात आपल्या स्तरावरुन गांभीर्याने उपाययोजना करावी,अश्या मागणी चे पत्र मा आ अमरसिंह पंडित यांनी दिले असून यावेळी उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,व गेवराई,  चकलांबा,तलवाडा,पोलिस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *