सोशल मिडीया वर देखील वाळू माफिया देतात प्रशासनाला अवाहन
पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी लक्ष घालण्याची गरज
गेवराई दि 23 ( वार्ताहार ) आजच्या युगात मोबाईल हा प्रत्येकांच्या जिवनाचा महत्वाचा घटक झाला यांच्या वापरावरूण सदरचा ईसम कसा आहे यांचे अनूमान देखील लावले जाते परंतू याचं सोशल मिडीयाचा फायदा घेऊन वाळू माफिया स्टेटस आणि स्टोरी ठेऊन पोलिस प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अवाहन देत आहेत तसेच अश्या गूंड प्रवृतीच्या ईसमावर कठोर कार्यवाई करण्याची गरज आहे जेने करूण कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहिल या प्रकरणी बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात वाळू माफियागिरी कायम अधिकारी यांच्या विषयी कळीचा मुद्दा राहिलेला आहे गोदाकाठच्या गावात यांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात येतो तो पण बेकायदेशीरच काही ठराविक अधीकारी यांच्यामुळे यांना बळ मिळते अनेक वेळा प्रशासन यांच्या विरूद्ध कार्यवाईचा बडगा उगारतो परंतू कूठलीतरी ‘राजकीय शक्ती याला लगाम लावण्याचा प्रयत्न करत असते असो परंतू शोशल मिडीया ही जगातील सर्वांत प्रभावशाली यंत्रना आहे यांचा योग्य प्रकारे केल्यास फायदा होतो परंतू काही लोक यांचा वापर बेकायदेशीर करत असतात तसेच रिल्स,स्टोरी,स्टेटस,च्या माध्यमातून कायद्याच्या धिंडवडे उडवताना पहावयास सर्रास मिळात आहे पोलिस यंत्रणेतील सर्वांत शक्तीशाली सायबर सेल यंत्रणा आहे यावर त्यांची करडी नजर असते.परंतू वाळू माफियांची सोशल मिडीयावर चाललेली दंबगगिरी त्यांना दिसत नाही का?प्रत्येक ठाण्यात गोपनिय शाखा आहे या शाखांना यांची माहिती नाही का?असे अनेक प्रश्न यंत्रणे विरूद्ध उदभवत आहेत तसेच कायद्याचा वचक ठेवण्यात प्रशासनाला नेहमी अग्रेसर असायला हवे परंतू असे होताना दिसत नाही वाढदिवस साजरा करतांना जशी ‘तलवार वापरली जायची परंतू कायद्याच्या रेट्याने ही प्रथा बंद पडली त्यांच पद्धतीने शोशल मिडीया वरील रिल्स चा वापर तलवारी सारखा केला जात आहे अश्या प्रवृत्तीच्या नांग्या ठेचायची आवश्यकता आहे म्हणून कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी लक्ष घालून या प्रकरणात कार्यवाई करण्याची गरज आहे व कायदा सुव्यवस्था यामुळे कोलमांडणार नाही यांची देखील दक्षता घेण्याची गरज आहे.