अट्टल महाविद्यालयात स्वागत आणि परिचय कार्यक्रम संपन्न

नवीन शैक्षणिक धोरणावर विद्यार्थ्यांचे समुपदेशन

गेवराई दि. 22 ( वार्ताहार ) , गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची ओळख आणि नवीन शैक्षणिक धोरण याविषयीचा परिचय तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्वागत आणि परिचय कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विभागांचा, विविध सुविधांचा, विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा परिचय करून देण्यात आला.

तसेच सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील सहकाऱ्यांचा आणि विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सह अभ्यासक्रम आणि इतर उपक्रमांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य मेजर विजय सांगळे यांनी केले, तर नवीन शैक्षणिक धोरणावर आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनुने यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून अध्यापनातील सातत्य टिकवण्यासाठी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. अभ्यासक्रमासह इतर उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *