
कोरबु गल्ली येथे कोविड १९ लसीकरण कॅम्प संपन्न.
354 नागरीकांचे लसीकरण यशस्वी.
गेवराई दि १ ( वार्ताहार ) कोरोना महामारीने अनेक कुटुंबातील धक्कादायक मृत्यु आपण पाहीले आहे. कोवीड महामारीवर लसीकरण हा एकच पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करण करून घेण्याची अवशक्ता आहे.
आपली व आपल्या कुटुंबाला पूर्णपणे सुरक्षीत ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची गरज आहे.सध्या तिसर्या लाटेचा धोक अपल्याला भोगावा लागु शकतो ? त्यामुळे लसिकरण आधिक करण्याची गरज आहे.यासाठी कोरबु गल्ली मोंढा विभागात दोन दिवसीय लसीकरण कॅम्प आयोजीत करण्यात आले होते.लसीकरण कॅम्प चे शुभारंभ मुफ्ती मोईनोद्दीन सहाब व तहसिलदार खाडे सर यांच्या हस्ते करण्यात आला होता.
जन जाग्रृती करुन जास्तीत जास्त मुस्लिम भागात लसिकरण करुन घ्यावे. कोरोना पासुन सुरक्षेत ठेवण्यासाठी लस हि आतिशय लाभदायक आहे.लस पासुन जिवाला कोणताही धोका नाही.भुलथापाला बळी पडु नये व जन जाग्रृती करुन जास्तीत जास्त टिका करण करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे अव्हान मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती मोईनोद्दीन सहाब यांनी लसिकरण कॅम्प येथे बोलतांनी सांगितले आहे.
कोरोणा १९ तिसर्या लाटेचा धोका होवु शकतो ? त्यासाठी अपल्या तालुक्यात आधिक-आधिक लसिकरण करुन घ्यावे.मदत केंद्र म्हणुन लसिकरण कॅम्प आयोजीत करणे हि एक समाजसेवा आहे.लसीकरण पासुन नागरीक वंचित राहुन नये यासाठी शहरात प्रत्येक ठिकाणी चौकात अरोग्य विभाग लसीकरणासाठी खुप मेहणत करत आहे. नागरीकांनी लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे उदघाटन प्रसंगी तहसिलदार खाडे बोलले आहे.
मोंढा विभागात लसीकरणा बद्दल जनजागृतीसाठी व जास्तीत जास्त नागरिकांची लसीकरण व्हावे या हेतुन सर्व पक्षीय व सर्व समाज बांधवांनसाठी आयोजक शेख उस्मान यांनी मदतकेंद्र म्हणुन दोन दिवसीय कोविड १९ लसिकरण कॅम्प शुभारंभ केले आहे.या शुभारंभ प्रसंगी वैधकिय आधिकारी डाॅ.चिचोळे,डाॅ.अंधळे सर, वसावे मॅडम, गर्जे मॅडम, हुलजुते सर,सोनाग्राह सर,मौलाना शब्बीर सहाब,मा.उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई,मा.नगरसेवक सय्यद एजाज, शेख हशम,खदिर बागवान,शेख सुभान,शेख उस्मान,अब्दुल भाई, हन्नासेठ, अकबर मुकादम,खय्युम बागवान, रशीद कुरेशी, जावेद पठान,सय्यद कौसर,शेख सलीम,शेख राजू,शेख अमजद,सय्यद नेहाल,शेख अहमद,जुनेद तांबोली,शेख शफीक, सय्यद मुदस्सिर, इमरान पठान,समीर पठान,शेख इब्राहिम,अजीम शाह,दिलावर पठान, नईम पठान,एजाज पठान,सोहिल पठान,शेख इस्तेखार,मोहन सेठ,शेख बडू,शेख राजू,यासीन भाई,शेख तौफीक,शेख शकील,शेख अखिल शेख,अनिस शेख,शेख सुभान,राजू बागवान,मोहसिन बागवान,मुंशी पटेल,पठान अबूजर, मुस्ताक कुरेशी शेख जवद्दीन,मुखिद तांबोली,राजु मिस्त्री,सय्यद रईस,शेख इद्रीस,शेख मोईन,शेख सलमान,शेख अलमान,व आदि नागरीक उपस्थित होते.