चोरांना मारण्यासाठी आलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला – सपोनि नारायण एकशिंगे

 

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) तालुक्यात सध्या चोरांनी धूमाकूळ घातला असतांना उपापूर याठिकाणी दिवसा घर फोडीचे प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांच्या मदतीने चोर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तसेच चोरांना पहाण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षतेबाबद प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले कारणाने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आहे असे चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि नारायण एकशिंगे यांनी सांगितले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की ,गेल्या महिना भरापासून अनेक गावांत ड्रोन व किरकोळ चोरीचे प्रमाण वाढत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर उमापुर परिसरात दूपारीच एक घरफोडीचा प्रकार समोर आला त्यानंतर गावकरी यांच्या मदतीने चार चोरांना पकडण्यात यश आले आहे तसेच शोशलमिडीयावर चोर पकडले असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हॉयरल झाला तसेच चोर कोण?आहेत हे बघण्यासाठी उमापूर चौकीत मोठी गर्दी झाली होती तसेच चोरांना चकलांबा पोलिस ठाण्याकडे घेऊन जात असतांना गायकवाड जळगाव परिसरातील नागरिक त्यांना पहाण्यासाठी रोडवर पोलिसांची गाडी अडवू लागले तसेच चकलांबा पोलिस ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तसेच आरोपीच्या सुरक्षतेबाबद प्रश्न उपस्थित झाला होता म्हणून पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला व जमाव पागविला तसेच याठिकाणी एका पत्रकार याला जाणिपुर्वक मारहान झाल्याचा प्रश्न विचारला असता जमाव एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की कोण?कूठे आहे हे समजणे कठीण होते असा काही प्रकार झाला आहे असे माझ्या निदर्शनास आले नाही असेही सपोनि नारायण एकशिंगे यांनी स्पष्ट केले आहे.तसेच गेल्या तिन दिवसापुर्वी आपण वाळूच्या गाड्याचे चित्रीकरण केल्यामुळे जाणिव पुर्वक मला मारहान केली असल्याचा आरोप पत्रकार अस्लम कादरी यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *