ड्रोन बाबद कूठलीही अधिकृत माहिती नाही – नीरज राजगूरू

नागरिकांनी सतर्क राहावे व पोलिसांना संपर्क करावा

गेवराई दि 13 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील विविध गावांत ड्रोनच्या गिरट्या पहावयास मिळत आहेत याबाबद अद्याप तरी प्रशासनाकडे याबाबद कूठलीही अधिकृत माहिती नाही नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये परिसरात चोर किंवा असे ड्रोन आढळून आल्यास त्यांची माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी जर रेंज मध्ये ड्रोन आढळल्यास ते तात्काळ पाडले जातील अशी माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील अनेक ग्रामिण भागात रात्रीच्या वेळी ड्रोन आढळून येत आहेत काही अपवाद वगळता काही ठिकाणी किरकोळ चोरीचे प्रकार समोर आले आहेत ग्रामिण भागातील नागरिक यांनी या बाबद दक्षता घ्यायची आहे तसेच शक्य असेल त्या ठिकाणी सीसीटिव्ही बसावेत जनावरे असनाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवावे,व आपल्या गावात किंवा परिसरात अनओळखी ईसम आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ संबंधीत पोलिस ठाण्यात किंवा आपल्या परिसरातील बीट आमलंदार याला द्यायची आहे सुरक्षतेबाबद गेवराई तालुक्यातील येनाऱ्या,गेवराई,चकलांबा,तलवाडा,दूरक्षेत्र उमापुर,व दूरक्षेत्र मादळमोही याठिकाणचे प्रमुखांना सुचना देण्यात आल्या आहेत तसेच रात्रीची गस्त देखील वाढविण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावे व अफवावर विश्वास ठेऊ नये असे अवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे तसेच या बाबद शोध सुरू आहे काळजी करण्याचे कारण नाही ड्रोन बाबद कसलीही माहिती प्रशासनाला मिळाली तर ती कळवली जाईल.असेही उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *