लोकेशन करणारे वाहने जप्त;13 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

महसूल व वाहतूक शाखेची मोठी कार्यवाई

गेवराई दि 13 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन फाट्यावर महसूल व वाहतूक शाखेचे पथक गस्त घालत असतांना त्यांचा पाठलाग करनाऱ्या चार मोटार सायकल व एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या पथकाने जप्त केली आहे तसेच ही अनाधीकृत वाळू वाहतूक यांचे लोकेशन करत असल्याची माहिती महसूल व वाहतूक शाखेचा वतिने देण्यात आली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,जिल्हाधिकारी अविनाश पाठक व पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ हे एक्शन मोडमध्ये आले आहेत तसेच त्यांनी वाळू माफियावर कार्यवाई करण्या संदर्भात कडक सुचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने महसूल व वाहतूक शाखा ही अलर्ट झाली आहे त्यांनी( दि 11 ) रोजी दहा च्या दरम्यान गस्त घालत असतांना राक्षसभूवन फाट्यावर त्यांच्या गाडीचा पाठलाग करनारे वाळू माफियांचे लोकेशन करनारे चार वेगवेगळ्या कपंनीच्या मोटार व एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या पथकाने जप्त केले आहेत तसेच या कार्यवाईत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ही वाहने पुढील कार्यवाईसाठी गेवराई पोलिस ठाण्यात लावण्यात आलेली आहेत. सदरची कार्यवाई ही जिल्हाधिकारी अविनाश पाठक,उप विभागिय अधिकारी कविता जाधव,पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ,तहसिलदार संदिप खोमणे,यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार संजय सोनवणे,सपोनि सुभाष सानप वाहतूक शाखा प्रमुख,तलाठी अनिल काटे, विशाल काटे, विशाल गायके, सुशांत गरूडकर,विजय अरसूडे,श्रीराम भोसले सह आदिंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *