गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील अवैध वाळू तस्करी चे रॅकेट उधवस्थ होणार का?

नुतन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांना गेवराईतून राहणार वाळू माफियांचे अवाहन

गेवराई दि 11 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून अवैध वाळू वाहतूक हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे गेवराईत येणारा ठाणेदार हा फक्त यांच्याकडेच लक्ष केंद्रित करतो व गब्बर होतो तसेच गेवराईच्या राष्ट्रीय महामार्गावरूण दररोज शंभर पेक्षा जास्त हायवाव्दारे अनाधीकृत वाळूची तस्करी केली जाते याला नुतन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ जरब घालनार का?व वाळू माफियांचे केंद्रबिंदू बनलेले गेवराई पोलिस ठाणे सरळ करणार का?तसेच गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून नुतन पोलिस अधिक्षक यांना वाळू माफियांकडून आवाहन असनार आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील बहूतांश भाग हा गोदाकाठ आहे तसेच याठिकाणाहून अनेक हायवा व्दारे वाळूची तस्करी याच हद्दीतून केली जाते तसेच गेवराई हे वाळू माफियांचे केंद्रबिंदू बनले आहे असे म्हटले जरी वावगे ठरणार नाही याठिकाण च्या परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते ही बाब पोलिसांना माहिती आहे तसेच याला देखील त्यांचा छूपा पाढिंबा आहे ही बाब अनेकदा उघड झाली आहे माफिया सोबतचे वरिष्ठ अधिकारी यांचे घनिष्ट संबंध आहेत कायदा व सुवैस्थेच्या दृष्टीकोणातून गेवराई पोलिस ठाणे कायम वादग्रस्त राहिलेले आहे काही मुजोर अधिकारी तसेच हम करे सो कायदा हा अभिर्भाव याठिकाणी आहे या सगळ्या बाबींचा काळजी पुर्वक आणि बारकाईने लक्ष दिल्यास अश्या बाबी निर्दशनास येतील की कायदा व सुवैस्था यांनी कोलमांडली आहे अनेक वाळूच्या गून्ह्यात मनामानी कारभार याला जरब बसने हा कायदाचा मुळ हेतू आहे तसेच वाळू हा विषय महसुल अंतर्गत येतो तरीही पोलिस प्रशासन आपल्या अर्थप्रेमापोटी यामध्ये हस्ताक्षेप करतो यांचे ज्ञानही गेवराई पोलिसांना देण्याची काळाची गरज आहे.नुतन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या वाळूच्या गून्ह्यातील तसेच जप्त मुद्देमाल याविषयी कागदोपत्री तपासणी करावी जेणे करूण सत्य परिस्थिती लक्षात येईल.तसेच या परिसरातून फोपावलेली माफियागिरी याला जरब घालण्याचे अवाहन त्याच्यासमोर असनार आहे तसेच माफियांचे केंद्रबिंदू बनलेले गेवराई पोलिस ठाणे सुताराखे सरळ व पारदर्शक करण्याचे जबाबदारी त्यांनी निश्चित करावी व अवैध वाळू तस्करी माफियागिरी ला आळा घालावा अशी मापक अपेक्षा त्यांच्याकडून हा तालूका करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *