तलवाडा पोलिस ठाणेदाराने रूजू झाल्या पासून वाळू प्रकरणी किती कार्यवाह्या केल्या?
नूतन पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज
गेवराई दि 9 ( वार्ताहार ) गेल्या सात ते आठ महिण्यापुर्वी तलवाडा पोलिस ठाण्याचा पदभार सपोनि सोमनाथ नरके यांनी स्विकारला तसेच त्यांनी या कालावधित वाळू संबधी किती?कार्यवाह्या केेल्या तसेच किती?प्रकरणात महसूल विभागाला दंडात्मक कार्यवाईसाठी पत्रव्यवहार केला आहे हे नूतन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी तपासावे जेणेकरूण तलवाडा पोलिस ठाणेदाराचा खरा चेहरा समोर येईल.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील वहूतांश भाग हा गोदाकाठ आहे,यामध्ये,गंगावाडी,राहेरी,पाढंरी,राजापूर,भोगलगाव,बोरगावथडी,रामपुरी,काठोडा,कटचिंचोली,असा या परिसरात खूलेआम अवैध वाळू उत्खनन करूण त्यांची तस्करी केली जाते ही बाब तलवाडा पोलिस ठाणेदार यांना अवगत आहे तसेच यांनी अतापर्यंत याठिकाणी किती कार्यवाह्या केल्या तसेच किती कार्यवाह्या यात दंडात्मक कार्यवाई झाली यांचा लेखा झोका खुला करावा तसेच वाळू उपसा आणि पोलिस यांचा कायदेशीर अर्थाअर्थी संबंध येत नाही गौण खणिज हा महसूल अंतर्गत विषय येतो तरीही पोलिस आपल्या अर्थप्रेमापोटी या विषयात हात घालतात आणि चोरीचे कलम लावतात तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत पांढरी गावात एका शेतकरी यांचे घर चोरट्यांनी घर फोडले यामध्ये लाखों रूपयाचा मुद्देमाल चोरीला गेला यांची खबर तलवाडा पोलिसांना मिळाली नाही परंतू वाळूने भरलेला ट्रॅक्टर या रोडने पळत आहे यांची माहिती तलवाडा पोलिस ठाणेदार सोमनाथ नरके यांना मिळते आणि ते लगेच आपले वसूलीदक्ष कर्मचारी विठ्ठल चव्हाण यांना सदर ठिकाणी पाठवतात आणि याला विरोध होतो म्हणून 34 जणांविरूद्ध गून्हा दाखल करतात यामध्ये काही लोक असे आहेत की ते बग्याच्या भूमिकेत होते तरीही त्यांच्या विरूद्ध गून्हा दाखल होतो ही शोकांतिका आहे तसेच तलवाडा ठाणेदार यांनी ही बाब महसूल विभागाला का?कळवली नाही यावर देखील संशय होत आहे तसेच नुतन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी तलवाडा ठाणेदार सपोनि सोमनाथ नरके यांनी वाळू विषयी किती?कार्यवाह्या केल्या व किती प्रकरणात दंडात्मक कार्यवाई केली हे तपासावे व तलवाडा ठाणेदार पदी खमक्या अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.