एकट्या गेवराई तालुक्यात लाडकी बहिण योजनेचे 45 हजार अर्ज
तालुक्यात प्रभावी अंमल बजावणी;तहसिलदार संदिप खोमणे यांची माहिती
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) मुख्यमंत्री यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्या पासून गेवराई मतदार संघात यांची प्रभावी अंमल बजावणी सुरू आहे तसेच जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी तात्काळ आपले अर्ज ऑनलाईन करावेत तसेच एकूण बीड जिल्ह्यात या योजनेसाठी 1 लाखा पेक्षा जास्त अर्ज आले आहेत तसेच एकट्या गेवराई तालुक्यात लाडकी बहिण योजनेसाठी 45 हजार अर्ज आले असल्याची माहिती गेवराई महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती यामध्ये प्रतिमहा 1500 रूपये राज्य सरकार या पात्र लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करणार आहेत तसेच राज्य शासनाच्या वतिने यांची प्रभावी अंमल बजावणी सुरू आहे यांच्या अशासकीय समित्या देखील नियुक्त करण्यात आल्या आहेत तसेच गेवराई महसूल विभागाच्या वतिने यांची अंमल बजावणी प्रभावी वेगाने सुरू केली अतापर्यंत संपुर्ण बीड जिल्ह्यात 1 लाखा पेक्षा जास्त अर्ज जमा झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यलयाने घेतली आहे तसेच एकट्या गेवराई तालुक्यात 45 हजार अर्ज महसूल विभागाकडे ऑनलाईन स्वरूपात आले आहेत तसेच पात्र लाभार्थी यांनी लवकर ऑनलाईन अर्ज करावेत असे अवाहन गेवराई महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...