मुरूमाची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर एक जेसीबी गावकऱ्यांनी पकडले पंरतू पोलिसांना उशीर झाल्याने पळाले
रोहितळ मधिल प्रकार;नागरिकात संतापाची लाट
गेवराई दि 5 ( वार्ताहार ) तालुक्यातील रोहितळ परिसरात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने व ट्रॅक्टर व्दारे दररोज अवैध मुरूम उतखनन करूण त्यांची त्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते व यातून अमाप संपत्ती गोळा केली जाते दररोजचच्या त्रासाला रोहितळ येथील गावकरी वैतागले आहेत अशीच रात्री एक वाजता या गावकऱ्यांनी चार ट्रॅक्टर व जेसिबी पकडून ठेवला आणि पोलिस प्रशासनाला डायल 112 वर कळवले परंतू पोलिस यांना उशीर झाल्याने सदरचे वाहने पळून गेले असल्याची घटना रात्री एक च्या सुमारास घडली.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात अनाधीकृत मुरूम उत्खनन यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे चित्र अलीकडच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात निदर्शनास आली आले आहे तसेच कोणत्याही शेतकरी यांच्या नावाने बनावट करार करूण तूटपुंजीत रॉयल्टी भरूण हा लाखों ब्रास मुरूम जेसीबी च्या साह्याने उपसा केला जातो रात्री रोहितळ या ठिकाणी गावातील नागरिकांनी याला त्रस्त होऊन चार ट्रॅक्टर व एक जेसीबी पकडला तसेच त्यांनी महसूल विभागाला संपर्क केला परंतू ते उपलब्ध झाले नाहीत तसेच डायल 112 ला कॉल केला असता पोलिस या ठिकाणी पोहचायला उशीर झाल्याने गावकरी यांच्याशी हूज्जत घालून चार ट्रॅक्टर एक जेसीबी यांनी पलायन केले तसेच ही सगळी वाहने ठाकर आडगाव ची असल्याची माहिती असून महसुल विभागाचे प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी या प्रकरणी लक्ष घालून ही अवैध मुरूम तस्करी थांबवावी व रात्री पळून गेलेल्या वाहनावर कायदेशीर कार्यवाई करावी अशी मागणी रोहितळ येथील ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आली आहे.