तहसिलदारांवर हल्ला करणारा जावेद पोलिसांना मिळेना की अटक करायची नाही
अटकपुर्व जामिनसाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज
गेवराई 2 ( वार्ताहार ) तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तहसिलदार संदिप खोमणे यांच्यावर हल्ला करणारा जावेद अद्याप पर्यंत गेवराई पोलिसांना मिळालेला नाही परंतू त्यांचा शोध गेवराई पोलिसांना घ्यायचाच नाही असे दिसून येत आहे या प्रकरणी तहसिलदार यांच्या वरील हल्ल्याचा मास्टर माइंन्ड जावेद पठाण याने गेल्या महिण्यातच बीड च्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनसाठी अर्ज केला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,रात्रीच्या वेळी गस्तीवर असनाऱ्या महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांच्यावर जावेद पठाण सह अन्य साथीदाराने हल्ला चढविला यातील ईतर आरोपी हे देखील निषप्नं झाले नाहीत तसेच गेवराई पोलिसांनी आरोपी जावेद पठाणचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तसेच या प्रकरणातील आरोपीने वापरलेली स्विफ्ट डिझायर कार मिळते? हायवा मिळते व आरोपीच गेवराई पोलिसांना मिळत नसल्याने गेवराई पोलिसांच्या कार्यप्रनाली वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच गेवराई तालुक्यात अवैध वाळू तस्करी हा कळीचा विषय आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांचे बगलबच्चे यात आहेत जावेद ला पण राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे तहसिलदार यांच्यावर हल्ला प्रकरणी गेवराई महसूलच्या वतिने पाच दिवस लेखणीबंद आंदोलन केले होते परंतू या आंदोलनाला देखील यश आले तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी याने बीड च्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिन साठी अर्ज दाखल केला आहे यावर अद्याप निकाल लागलेला नाही गेवराई पोलिसांना हा आरोपी मिळेना की त्यांना त्याला शोधायचे नाही?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.