तहसिलदार संदिप खोमणे यांची कार्यवाई;तिन कोटींचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 30 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी छापा मारला असता सात हायवा त्यांनी या कार्यवाईत जप्त केल्या असल्याची माहिती असून तसेच या कार्यवाईत अंदाजे तिन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती असून एक ब्रास वाळू ही यावेळी जप्त करण्यात आली आहे.तसेच ही कार्यवाई आज ( दि 30 ) रोजी सकाळी सातच्या सुमारास केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन परिसरात वाळू माफियांनी हौदोस घातला होता तसेच याठिकाणी ही गेल्या पंदरा दिवसांत तिसरी कार्यवाई आहे तसेच गेल्या आठ दिवसापुर्वी राक्षसभूवन च्या 21 वाळू माफिया यांच्यावर नावानिशी गून्हे दाखल करण्यात आले होते तसेच आज सकाळी गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांना गूप्त बातमी दाराने या ठिकाणी वाळू उपसा करूण त्यांची तस्करी हायवाव्दारे करण्यात येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथका समवेत सदर ठिकाणी छापा मारला तसेच या कार्यवाईत तिन कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच एक हजार ब्रास वाळू देखील जप्त करण्यात आली आहे आतापर्यंत सगळ्यात मोठी ही कार्यवाई महसूल विभागाकडून करण्यात आली आहे एकाच ठिकाणाहून सात हायवा जप्त केल्याने वाळू माफियात मोठी खळबळ उडाली आहे तसेच या कार्यवाईत तहसिलदार संदिप खोमणे, नायब तहसिलदार सोनवणे,सह चकलांबा पोलिस ही सहभागी होते.