गेवराई दि 29( वार्ताहार ) बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये शुक्रवार रोजीच गेवराई मध्ये लाच स्वीकारणाऱ्या तांत्रिक सहाय्यकावर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती त्यानंतर चौथ्याच दिवशी गेवराई मध्ये पुन्हा लचखोरीची घटना समोर आलीये वरीष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाकडुन लाचेची मागणी करण्यात आली होती.त्यासाठी दोन हजार सातशे रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला बीड लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,भारत शेषराव येडे ( वय – ५७ ) रा.आश्रम शाळेच्या बाजुला शिक्षक काॅलनी गेवराई ) असं लाचखोर मुख्याध्यापकाचं नाव असून मुख्याध्यापक येडे हे मन्यारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते.या कारवाईने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून.याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.तक्रारदार शिक्षक यांचे वरीष्ठ श्रेणीचे बिल तयार करून मंजूर करण्यासाठी दहा टक्के प्रमाणे 2700 रुपये लाचेची मागणी पंचाक्षम केली होती.हीच लाचेची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक भारत येडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथील पोलिस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख, गुलाब बाचेवाड, पोलीस हवालदार सुरेश सांगळे , भारत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, गणेश म्हेत्रे यांनी केली.