दोन ट्रॅक्टरवर तहसिलदार संदिप खोमणे यांची कार्यवाई
दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 28 ( वार्ताहार ) तालुक्यातील खामगाव शिवारात जून्या पूलाखालून अवैधरित्या वाळूची वाहतूक करनारे दोन ट्रॅक्टर वर गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी कार्यवाई केली आहे तसेच या कार्यवाईत दहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,खामगाव परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाळू उपसा करूण त्यांची ट्रॅक्टरव्दारे बेकायदेशीर वाहतूक करूण विक्री केली जात होती तसेच या प्रकरणी गेवराई महसूल मध्ये याविषयी अनेक तक्रारी प्राप्त होत्या त्याअनूषंगाने गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी खामगाव परिसरात आपल्या पथकासोबत छापा मारला असता त्यांनी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले असल्याची माहिती तहसिलदार संदिप खोमणे यांनी दिली आहे तसेच दंडात्मक कार्यवाईसाठी हे ट्रॅक्टर तहसिल कार्यलयात लावण्यात आले आहेत.