तूतीच्या फाईवर सही करण्यासाठी दहा हजाराची मागितीली लाच
एकावर गेवराईत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई
गेवराई दि 26 ( वार्ताहार ) तालुक्यामध्ये लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे रेशीम उद्योग विकास योजना बीड अंतर्गत पंचायत समिती गेवराई येथे कार्यरत असणारा तांत्रिक सहाय्यक संदीप रोहिदास राठोड याला दहा हजाराची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे
या बाबद सविस्तर माहिती अशी तक्रारदार यांच्या शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती त्यासाठी नरेगा अंतर्गत फाईल दाखल करून मंजूर करण्यासाठी आरोपी संदीप राठोड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून खाजगी इसमाकडे देण्याचे सांगितले
खाजगी इसम चंद्रकांत धर्मराज शेळके यांनी पंच साक्षीदारा समोर दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून खाजगी इसम यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीसांत सुरू आहे. सदरची कारवाई शहरातील माऊली अॅटो गॅरेज येथे करण्यात आली आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील , पोलीस हवालदार सुनील पाटील,विलास चव्हाण,सी एन बागुल यांच्या सह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.