January 22, 2025

मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या मुस्लिम समाजातील अय्युब बागवान यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी – उद्धव मडके 

 

गेवराई दि 25( वार्ताहर ) मराठा आरक्षण आंदोलनात सावली सारखी साथ देवून खांद्याला खांदा लावून सोबत काम करणाऱ्या मुस्लिम समाजातील ओबिसी असलेल्या आणि समाज हितासाठी लेखणीच्या माध्यमातून गोर गरिबांचा आवाज बुलंद करणारे पत्रकार अय्युब बागवान यांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधासभेची उमेदवारी देवून मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे , अशी मागणी युवा नेते उद्धव मडके यांनी केली आहे.

गेवराई विधासभा मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजातील अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत.त्यामुळे इच्छुक असलेल्या मराठा कार्यकर्त्या मध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, गेल्या
आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनात मुस्लिमांनी सक्रिय सहभाग घेवून जीवाचे रान करून मराठा समाजाच्या लढ्यात सहभाग घेतलेला आहे. त्याची पावती म्हणून मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे या पूर्वी मुस्लिम समाजातील पत्रकार इम्तियाज जलील यांना संधी मिळाली होती. त्यांनी सर्व समाजासाठी या संधीचे सोने केले होते. त्याच धर्तीवर गरीबांचे कैवारी,दीन दुबळ्याचा आवाज लेखणीच्या माध्यमातून उठवणारे,जिगरबाज पत्रकार अय्युब बागवान यांच्या समाजकार्याची पावती म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेवराई विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी उद्धव मडके यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार अय्युब बागवान यांनी सर्व सामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी, पत्रकारितेत काम केले आहे. मितभाषी स्वभाव असलेले बागवान ओबीसी समाजाचे आहेत. सर्व सामान्य माणसाचा कैवारी होऊन,त्यांनी पत्रकारितेत शाश्वत भूमिकेतून बातमीदारी केली आहे. सर्व समाज बांधवांचा त्यांना पाठिंबा असून, मनोज दादा जरांगे-पाटील यांनी बीड जिल्ह्य़ातून गेवराई विधानसभेचा उमेदवार देताना, अल्पसंख्याक समाजातून पत्रकार अय्युब बागवान यांचा विचार करावा, अशी मागणी युवा नेते उद्धव मडके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *