गेवराईचा आमदार ओबीसीतूनच झालाच पाहिजे – प्रा लक्ष्मण हाके
गेवराई दि.२२ ( वार्ताहार ) ओबीसीच्या हक्काची जाणीव ठेवून काम करणारी दहा-पाच पोरं विधानसभेच्या सभागृहात बसली पाहिजेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दलित,ओबीसीची मोट बांधून एकदिलाने काम करावे लागणार आहे. तरच गेवराईचा आमदार ओबीसीतून होईल.भावांनो ती वेळ आली असून उद्याचा आमदार आपलाच झाला पाहिजे, असे जाहीर आवाहन करून अठरापगड जातीची मने समजून न घेता, केवळ मतासाठी आपला वापर झाल्याचा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण बचावचे नेते प्रा .लक्ष्मण हाके यांनी गेवराई येथे बोलताना केला. सोमवार दि . 22 जुलै रोजी दु. 1 वाजता गेवराई शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसीतून आरक्षण बचाव जन आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेवराई तालुक्यातील ओबीसीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जन आक्रोश मेळावा आयोजित केला होता. गेवराई शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शहागड येथे ओबीसी जन आक्रोश रॅलीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बागपिंपळगाव येथून त्यांची उघड्या जीपमधून भव्य रॅली काढण्यात आली. शहरातील ओबीसी गटाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रा. हाके यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार स्वागत केले. विविध अठरा पगड जातींच्या ओबीसींच्या हस्ते प्रा . लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे आणि कोअर टीमचे स्वागत करण्यात आले . वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले . प्रा. हाके यांनी जोशपूर्ण अभ्यासपूर्ण भाषेत आरक्षणाचा प्रश्न, लढा सविस्तरपणे मांडून ओबीसींची मने जिंकली. ते म्हणाले,एवढे वर्ष झाली आजवरच्या सत्तारूढ पक्षाने अठरापगड जातीचे अंतःकरण समजून घेतले नाही. म्हणून आपण मागे राहिलोत. असे असताना जरांगे-पाटील आमच्या ताटातले का मागत आहेत ? शेकडो वर्षांपासून सत्तारूढ आहात.एका बाजुला क्षत्रिय म्हणता आणि पुन्हा कुणबी म्हणायचे ? असा रोखठोक सवाल करून ते म्हणाले की, लोकसभेचा निकाल भाजपा विरूद्ध गेला. भाजपाचा पराभव जरांगे-पाटील यांनी केला. असा भ्रम दूर करण्याची गरज आहे. आम्ही 60% आहोत.भविष्यात दलित,मुस्लिम,दलित,ओबीसी युती झाली पाहिजे. ती काळाची गरज म्हणून गेवराई तालुक्यातील सर्व ओबीसी समाजाने लहान लहान जातींना सोबत घेण्याची गरज आहे. तरच गेवराई विधानसभेत ओबीसीचा आमदार निवडून जाईल, असा दृढ विश्वास प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले . यावेळी प्रा पी टी चव्हाण, सुघोष मुंढे यांचीही समयोचित भाषणे झाली . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा . चव्हाण, परमेश्वर वाघमोडे, प्रा. गणपत काकडे , दादासाहेब चौधरी , बापू गाडेकर , अंबादास पिसाळ, फुलचंद बोरकर, गजानन काळे, मयुरी मस्के,देवकते ,खटके तात्या आदींनी परिश्रम घेतले . प्रा हाके यांच्या भाषणादरम्यान काही उत्साही लोक घोषणा देत होते . सभेस हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...