काही तासांतच चोरीला गेलेले ट्रॅक्टर गेवराई पोलिसांनी शोधले
आता चोर शोधण्याचे देखील अवाहन
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) गून्ह्यातील जप्त मुद्देमाल असनारे ट्रॅक्टर ज्याचा मालक मयत आहे व ते गून्ह्यातील मुद्देमाल आहे असे ट्रॅक्टर ठाण्यातीलच एका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पळवले होते ते गेवराई पोलिसांनी हॉटेल चावार्क च्या पाठीमागे सिमेंट रोडच्या लगत लावण्यात आले होते ते आता गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे कोणी?चोरले होते व यांना मदत करनारा पोलिस कर्मचारी शोधण्याचे अवाहन आता गेवराई पोलिसां समोर आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी वाळूच्या गून्ह्यातील जप्त ट्रॅक्टर मुद्देमाल यांची माहिती बाहेरच्या साथीदारानां देतो तसेच ते ठाणेदार व ईतर कर्मचारी हे बाहेर असतांना हीच संधी साधून मूद्देमाल चोरी करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून ही माहिती एका गूप्त बातमीदाराने एका वरिष्ठ अधिकारी यांना दिली होती तसेच त्यांच्या आदेशानंतर सदरचे चोरून घेऊन गेलेले ट्रॅक्टर हॉटेल चावार्क च्या पाठीमागे लावण्यात आले होते ते गेवराई पोलिसांनी जप्त केले असून त्यांचा पंचनामा करून संबंधीत पोलिस कर्मचारी व साथीदार यांच्यावर कार्यवाईची मागणी होत आहे.