ये चोर मचाऐ शोर; जप्त मुद्देमाल चोरणारे रॅकेट सक्रीय
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाण्यात जड वाहणे लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही तसेच अनेक गून्ह्यातील मुद्देमाल हा जून्या पोलिस कॉलणी परिसरात लावण्यात आलेले आहेत तसेच ठाण्यात ठाणेदार ठाण्यात नसल्या नंतर तसेच सुट्टीवर असल्यानंतर संधीचा फायदा घेऊन एका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने ट्रॅक्टर,ट्रॉली,तसेच केन्या पळवल्या जातात हे रॅकेट बऱ्याच दिवसापासून सक्रीय असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई पोलिस ठाण्यात वाळू उपसा विरोधात अनेक गून्हे दाखल आहेत तसेच वाहनाना कागदपत्र नाहीत या कारणाने अनेक गून्ह्यातील मुद्देमाल हा नाही तसेच एक पोलिस कर्मचारी याने आपले काही बाहेरचे साथीदार यांच्या मदतीने याठिकाणा वरूण ट्रॅक्टर व ट्रॉली व केन्या पळपवल्या आहेत तसेच गेल्या दोन दिवसा पुर्वीच याठिकाणा वरूण पुन्हा या टोळीने एक ट्रॅक्टर पळवले असल्याची माहिती आहे तसेच ही माहिती एक बड्या पोलिस अधिकाऱ्याला एक गूप्त बातमी दाराने दिली आहे तसेच या प्रकरणी काय?कार्यवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच हा पोलिस कर्मचारी कोण?अशी देखील चर्चा सुरू आहे.