गजापुर भ्याड हल्लाचा हजारो समाज बांधवांनी केला निषेध
गेवराई दि 19 ( वार्ताहार ): मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद नही चलेंगी नही चलेंगी दादा गिरी नही चलेंगी अश्या जोरदार घोषणा देत गेवराई शहरातील छ.शिवाजी चौक ते तहसिल कार्यालय परिसर समाज बांधवांनी दणाणुन सोडत गजापुर येथे झालेल्या अमानुष हल्लयाचा तिर्व शब्दात निषेध व्यक्त करुन या हल्ल्यात नुकसान ग्रस्त लोकांना तात्काळ मदत करुन घटनेला जबाबदार दहशतवादांना अटक करुन न्याय द्यावा या मागणीचे निवेदन हजारो बांधवाच्या साक्षिने तहसिलदार संदिप खोमने यांना देण्यात आले तसेच त्यांच्या मार्फत राज्यपाल मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
राज्यात सर्वत्र हिंदु मुस्लिम यांचे सलोख्याचे संबध असतांना अचानक काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी विशालगड अतिक्रमण प्रकरणांच्या नावाखाली गडा पासून ४ किमी लांब असलेल्या व अतिक्रमण प्रकरणाशी दुर पर्यंत संबध नसलेल्या मुस्लिम वस्ती असलेले गजापुर गावात जाऊन हिंदूवादी गुंडांनी हैदौस घालून घराचे तोडफोड करुन जिवन महिला सह लेकरांना जबर मारहाण करत गावातील जामा मस्जिद वर हल्ला करुन त्यांची विटंबना करुन समस्त मुस्लिम समाजच्या भावनावर हल्ला केला असल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गेवराई शहरातील छ. शिवाजी चौक येथून मिरवणुक मार्गे तहसिल कार्यालयात हजारो मुस्लिम बांधवा सह दलित मराठा ओबीसी बांधवांनी सहभाग घेवून मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद नही चलेंगी नही चलेंगी दादा गिरी नही चलेंगी, हल्लेखोर दहशतवादांना अटक करा अश्या घोषणांनी सर्व परिसर दणाणुन सोडत गजापुर येथील घटनेचा तिर्व निषेध व्यक्त केला असून विविध समाजातील समाजबांध यामध्ये सहभागी झाले होते
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...