गेवराई दि 6 ( वार्ताहार ) गेल्या चार दिवसांपुर्वी आहेरवाहेगावच्या गट क्रंमाक 55 मध्ये अनाधीकृत वाळू साठा महसूलच्या मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदरची वाळू पंचनामा करूण जप्त केली तसेच ज्या दिवशी ही वाळू जप्त केली त्याच दिवशी ही वाळू चोरट्यांनी पळवली अशी फिर्याद पाडळशिंगीचे तलाठी यांनी गेवराई पोलिसांत दाखल केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन परिसरातून चोरटी वाळू वाहतूक करूण सुमारे पाचशे ते सहाशे ब्रास वाळू साठा आहेरवाहेगाव याठिकाणी गट क्रंमाक 55 मध्ये करण्यात आला होता परंतू याठिकाणच्या मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कमी प्रमाणात पंचनामा करूण स्थानिक वाळू माफिया यांच्याशी संगनमत करून हा साठा उचलण्यात आला असल्याची माहिती आहे तसेच हिरापूरच्या भाईची ही करामत टोल नाक्याच्या सीसी टिव्हीत कैद झाली आहे तसेच आठ हायवा आणि रोडर हे या सीसी टिव्हीत कैद झाले आहेत आपल्या अंगावर काही येऊ नये म्हणून मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार संदिप खोमणे यांना चूकीची माहिती दिली आणि तलाठी अविनाश लांडे यांना याबाबद आज्ञातावर गून्हा दाखल करण्यास भाग पाडले तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा नोंद झाला आहे तसेच वरील कृत हे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जानून बूजून केले असेल तर त्यांच्या विरूद्ध कायदेशीर कडक कार्यवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल अशी माहिती तहसिलदार संदिप खोमणे यांनी दिली आहे.तसेच या घटनेची सखोल चौकशी करूण आरोपी व वाहनांवर कार्यवाई करणार असल्याचे तपास अधिकारी पोउपनि शेळके यांनी सांगितले