महसूल हल्ला प्रकरणी आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना
उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांची माहिती
गेवराई 27 ( वार्ताहार ) महसूल पथकावर हल्ल्यानंतर गेवराई महसूल प्रशासनाच्या वतिने काल पासून तहसिल कार्यलय बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे आरोपी अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती असून आता गेवराई पोलिस व उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांचे विषेश पथक असे दोन पथके या हल्लेखोर जावेद पठाण यांच्या शोधात रवाना केली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राजकीय पुढाऱ्याचा बग्गल बच्चा असनारा जावेद पठाण यांने आपल्या सोबत काही गूडांना घेऊन गेवराईच्या महसूल पथकावर हल्ला चढविला आणि तो पसार झाला तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत दहा जणांविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे परंतू आरोपीला अटक करावी या मागणीसाठी महसूल प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून तहसिल कार्यलय बंद ठेऊन निषेध नोंदविला आहे तसेच पोलिस ही याविषयी सतर्क आहेत गेल्या दोन दिवसापासून दोन पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना केली आहेत तसेच गून्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पोलिसांनी ताब्यात घेतली असून आज संध्याकाळ पर्यंत या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार जावेद पठाण याला अटक करू तसेच कोणत्याही माफियांनी कायदा हातात घेतल्यास त्याच्यांविरूद्ध कडक कार्यवाई करू असेही उप विभागिय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी सांगितले आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...