April 29, 2025

वीज पडून तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

 

गेवराई दि 26 ( वार्ताहार )  गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. 


या  बाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने  शालनबाई शेषराव नजन वय 65 यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय 40 तर विजु बाई बाळासाहेब खेडकर वय41 असा या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला तिनी महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष 65 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *