आरोपी च्या अटके साठी महसूल करणार उद्या पासून धरणे आंदोलन
उपविभागीय पोलिस अधीकारी यांना महसूलचे निवेदन
गेवराई दि 26 ( वार्ताहार ) महसूल पथक गस्तीवर असतांना त्यांच्यावर नऊ लोकांनी हल्ला चढविला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने महसूल मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत तहसिलदार संदिप खोमणे यांच्या फिर्यादी वरूण गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी गेवराई महसूलच्या कर्मचारी यांनी केली आहे आज आरोपी अटक न केल्यास उद्या ( दि 27 ) पासून नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी,तलाठी,यांच्या सह कर्मचारी गेवराई तहसिल कार्यलया समोर धरणे आंदोलन करणार आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गौण खनिज पथक रात्रीस गस्त घालत असतांना एका हायवावर कार्यवाई करण्यास गेले होते तसेच त्यांना गाडी आडवी लाऊन भ्याड हल्ला करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून गेवराई महसूलचे प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी अनेक वाळू माफिया विरूद्ध गून्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच राक्षसभूवन या ठिकाणी 50 जणाविरूद्ध गून्हे दाखल आहेत अश्यातच महसूल पथक आपले कर्तव्य पार पाडत असतांना अश्या प्रकारे त्यांच्यावर हल्ला होणे हे अनअपेक्षीत आहे तसेच वाळू माफियांनी नेहमीच महसूल अथवा पोलिस यांच्या पथकावर हल्ला चढविल्याच्या घटना वाढत आहेत यांचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे तसेच गेवराई महसूल पथकावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी जावेद शेख याला राजकीय वरदहस्त आहे यामुळे याला तात्काळ अटक करावी अशी मागणी गेवराई महसूलच्या वतिने उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे करण्यात आलेली आहे.तसेच यावेळी नायब तहसिलदार,मंडळ,अधिकारी,तलाठी,कोतवाल,यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.तसेच काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील अशी हमी गेवराईचे उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी महसूल च्या कर्मचारी यांना दिली आहे.