मंडळ अधिकारी,तलाठी यांना धक्काबूक्की करत गाडी फोडली
गेवराई दि 26 ( वार्ताहार ) गेवराई शहरा लगत असनाऱ्या बायपास वर पांडरवाडी शिवारात वाळू माफियांनी गेवराईच्या महसूल पथकावर रात्री उशीरा हल्ला चढविला आहे तसेच शासकीय वाहन यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती असून ही घटना ( दि 26 जून ) च्या रात्री दोन ते अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराईचे मंडळ अधिकारी व गेवराई सज्जाचे तलाठी हे महसूल पथक अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर होते तसेच त्यांना माहिती मिळाली की काही हायवा गेवराई बायपास वरूण वेगात बीड च्या दिशेने जात आहेत त्यांच्यावर कार्यवाई करण्यासाठी गेवराई बायपास वरील पांढरवाडी शिवारात त्यांनी एक हायवा पकडला तसेच हा घेऊन जात असतांना महसूल पथकाला चार ते पाच जणांनी विरोध केला व मंडळ अधिकारी व तलाठी यांना धक्काबूक्की करूण हायवा पळविला व महसूल ची सरकारी गाडी फोडली आहे तसेच हे हल्लेखोर बीडचे आहेत व चार चाकी पाढंऱ्या रंगाच्या स्विफ्ट मध्ये आले होते हा हायवा बीडच्या एका बड्या नेत्याचा होता अशी माहिती आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या हल्याची माहिती रात्री उशीरा गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी सोशलमिडीया वर शेयर केली आली आहे.