महसूल एक्शन मोडवर परंतू पोलिसांची झूकेगा नहीं साला ची भूमिका
गेवराई दि 16 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत सुरळेगाव व राक्षसभूवन परिसरात मोठ्या जोमात वाळू उपसा होत असल्याची माहिती आहे तसेच गेवराई महसूलचे प्रमुख तहसिदार संदिप खोमणे यांच्या आदेशाने तालूक्यातील अनेक रस्ते जे गोदापात्रात जातात आणि त्या रस्त्यावरूण अवैध वाळू वाहतूक केली जाते असे रस्ते बंद करण्यात येत आहेत व महसूल वाळू माफिया विरूद्ध कठोर भूमिका घेत आहे तसेच चकलांबा पोलिस ठाणेदार झूकेगा नहीं साला च्या भूमिकेत पहायवयास मिळत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील अनेक गावांत अवैध वाळू तस्करीमुळे कायदा व सुवैस्था बिघडत चाललेली आहे गेल्या दोन दिवसापुर्वीच राक्षसभूवन गोदापात्रातून जप्त केलेली वाळू चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली परंतू महसूल प्रशासन वाळू माफिया विरोधात कार्यवाईला कमी पडते अशी शंका उपस्थित केली जात होती परंतू असे नाही अवैध वाळू तस्करी याला खतपाणी घालण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून होत आहे हे आता निश्चित झाले आहे आता राक्षसभूवन वगळता वाळू माफियांनी आपला मोर्चा हा सुरळेगाव परिसराकडे वळवण्यात आला आहे तसेच हिंगणगाव परिसरात कार्यवाई करत असताना दोन वाळू माफियांनी महसूल पथकासोबत हूज्जत घातली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे तसेच चकलांबा परिसरात आपण एकही कार्यवाई करणार नाही तसेच चकलांबा ठाणेदार यांच्या झूकेगा नहीं साला च्या भूमिकेला वरिष्ठही वैतागले असून लवकरच या ठाण्याचा कारभार चांगल्या अधिकाऱ्यांकडे सोपण्यात येईल.अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.