April 29, 2025

रहदरीस अडचण करनाऱ्या वाळूच्या गाड्या राक्षसभूवन माजी सरपंचानी अडवल्या

प्रशासनाला कळवले मात्र कूणीही फिरकले नाही

गेवराई दि 10 ( वार्ताहार ) जून महिना सुरू होताच गोदाकाठचा शेतकरी शेती मशागतीला लागला असतांना गावात जाण्याचा रस्ता अरूंद आहे त्यातच वाळू वाहतूक करनाऱ्या गाड्या अडचण निर्माण करत असल्याने रात्री राक्षसभूवन परिसरात या वाळूच्या गाड्या जाऊ दिल्या नाही तसेच काही गाड्याच्या काचाही फोडल्या असल्याची माहिती असून तरीही स्थानिक चकलांबा ठाणेदाराला काही फरक पडलेला नाही.तसेच ही घटना ( दि 9 जून ) रोजी रात्री घडली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही महिण्यापासून चकलांबा ठाणे अंतर्गत येनाऱ्या राक्षसभूवन परिसर वाळू माफियांनी लुटून काढला असतानां आता जून महिण्याची सुरूवात होताच दोन चांगले पाऊस पडले आहेत शेतकरी शेती मशागतीसाठी लागला आहे परंतू याठिकणचा रस्ता अरुंद आहे वाळूच्या गाड्याचा नाहक त्रास गावकरी यांना नाहक सहन करावा लागत असल्या कारणामुळे रात्री मोठ्या प्रमाणावर वाळूच्या हायवाच्या रांगा लागल्या होत्या गावातील माजी सरपंच संभाजी नाटकर यांनी या वाळूच्या गाड्या रोखल्या व गावात जाऊ दिल्या नाही काही काळ याठिकाणी वाळू माफिया आणि त्यांच्यात बाचाबाची झाली माजी सरपंच यांनी काही वाळूच्या गाड्याच्या काचाही फोडल्या तसेच महसूल व पोलिस यांनाही याबाबद सुचना दिली परंतू हात बांधले असल्या कारणाने कूणीही याठिकाणी फिरकले नाही तसेच गेल्या काही दिवसापासून चकलांबा ठाणेदार यांची कारकिर्द ही वादग्रस्त झाली आहे आता यापुढे जर गावात वाळूची गाडी घूसली तर प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा माजी सरपंच संभाजी नाटकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *