गेवराई दि 8 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील गोंदी परिसरात गेवराई पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी गेले होते त्याठिकाणच्या वाळू माफियात आणि त्यांच्यात देवाणघेवानीच्या कारणावरूण वाद झाला आणि याठिकाणच्या वाळू माफियांनी या दोन्ही पोलिस कर्मचारी यांना चांगलाच चोप दिला असल्याची माहिती असून उद्याप पर्यंत या प्रकरणाला गेवराई पोलिसांकडून दूजोरा मिळालेला नाही.ही घटना आज ( दि 8 जून ) रोजी सकाळी 6 वाजता घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दी अंतर्गत येनाऱ्या गोंदी व कटचिंचोली परिसरात वाळू माफियांनी हैदोस घातला असून यापरिसरात तलवाडा पोलिसांनी गेल्या दोन दिवसापुर्वी तिन ट्रॅक्टरवर कार्यवाई केली होती तसेच आज सकाळी आपल्या खाजगी कारणासाठी गेवराई पोलिस ठाण्याचे हे दोन कर्मचारी सकाळी सहा वाजताच गोदापात्रात गेले आणि त्या ठिकाणी देवाण घेवाणीच्या कारणा वरूण वाळू माफियात आणि त्यांच्यात हानामारी झाली असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे तसेच या प्रकरणी अद्याप गून्हा दाखल नाही तसेच गेवराई पोलिस प्रशासना कडून अशी कूठलीच घटना घडली नसल्याचे सांगण्यात येत आहे परंतू या कर्मचारी यांना चोप दिल्याने अनेक पोलिस कर्मचारी तोंड सूख घेत आहेत.तसेच हे कर्मचारी कोण?आहेत हे अद्याप समजू शकले नाही