पोलिस अधीक्षक साहेब दिवसा राक्षसभूवन मध्ये पन्नास हायवा भरल्या
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) चकलांबा ठाणे दारांच्या अर्थप्रेमातून दिवसाच अवैध वाळू तस्करी होत आहे याला लगाम लावण्याऐवजी संरक्षणात हायवाव्दारे अवैध वाळूची तस्करी सुरू आहे आजच दूपारी एक हायवाने तिन जणांना जखमी केले असल्याची घटना असतानांच ( दि 7 जून रोजी ) राक्षसभूवनच्या गोदापात्रात साडेपाच वाजताच पन्नास हायवा एकामागे एक भरून जात आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत येनाऱ्या राक्षसभूवन या परिसरात चकलांबा ठाणे दारांच्या अर्थप्रेमातून वाळू माफिया दरोडा टाकण्याचे काम करत आहेत याला लगाम लावण्याऐवजी पोलिस संरक्षणात वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे पोलिस अधीक्षक साहेब चकलांबा पोलिस ठाणे बीड जिल्ह्यात येत नाही का?असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे तसेच दिवसाच आपल्या स्वार्थासाठी ही तस्करी करनारे तसेच याला बळ देणाऱ्या चकलांब्याच्या ठाणेदाराला भानावर आना अशी अपेक्षा आपणांकडून केली जात आहे.तसेच याबाबद कठोर पाऊले उचलून चकलांब्याला खमक्या अधिकारी यांची नेमणूक करा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.