April 29, 2025

हायवाने दिली छोटा हत्तीला धडक;तिनजण गंभीर 

गेवराई- दि 7 ( वार्ताहार ) भरधाव हायवा आणि छोटा हत्तीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.७) दुपारी बारा वाजण्याच्या   सुमारास तालुक्यातील बेलगाव फाट्याजवळ घडली. जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऊमापूर शेवगावकडून येणाऱ्या (एम.एच १२ एलटी ७७६५) हायवाची बेलगाव फाट्यानजीक आज दुपारी तळणेवाडीकडे जाणाऱ्या छोटा हत्तीची (एमएच १६ ऐ.वाय ०५७९) समोरासमोर धडक झाली. यात लक्ष्मण सगळे (वय २१, रा. तळणेवाडी, ता. गेवराई), गणेश महादेव मोहिते (वय २०, रा. तळणेवाडी) शरद नारायण मोहिते (वय १६, तळणेवाडी) हे तिघेजण जखमी झाले. अपघातानंतर हायवा चालक फरार झाला. छोटा हत्ती गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *