एसपी साहेब राक्षसभूवनचे गोदापात्र वाळू माफियांना आदंन दिले का?
चकलांबा ठाणेदारापेक्षा होमगार्ड बरा म्हणन्यांची वेळ
गेवराई दि 6 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील बहूतांश भाग हा गोदापात्रात येतो बोरगांव,गूतेगांव,राक्षसभूवन,गूळज,सुरळेगाव,या आदी गावांत अवैध वाळू तस्करी करूण तीची विल्हेवाट लावत आहेत हा सगळा प्रकार चकलांब्याच्या ठाणेदार यांना माहित नसावा का?तसेच गोदापात्र वाळू माफियांना आदंन दिले की काय?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे तसेच या ठाणेदारापेक्षा होमगार्ड बरा म्हणायची वेळ याठिकाणच्या नागरिकांना आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी यांची ओरड आहे या प्रकरणी अनेक तक्रारी पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांच्याकडे प्रस्तावित आहे एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर चक्क रेटकार्ड देऊनच तक्रार केली होती तरीही या ठिकाणचा वाळू उपसा बंद होत नाही ही शोकांतिका आहे चकलांबा पोलिस ठाणेदाराचा कारभार कार्यशून्य आहे तसेच याठिकाणी खमक्या अधिकारी बसवण्याची गरज आहे याठिकणची कायदा व सुवैस्था टिकवायची असेल तर चकलांबा पोलिस ठाणेदार यांची खातेनिहाय चौकशी करावी तसेच यांच्यावर राजपत्रीत अधिकारी यांची निगरानित त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करावी व चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत कायदा व सुवैस्था टिकवावी अशी मागणी होत असून कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी या प्रकरणी लक्ष घालून वाळू उपसा थांबवावा अशी अपेक्षा सर्व सामान्य त्याच्यांकडून करत आहे.