स्टेशन डायरीला दोन गाड्यांची नोंद मात्र गून्हा एकावरच
गेवराई दि 2 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन शनिचे याठिकाणी एका न्यायाधीशांच्या खाजगी गाडीला कट मारलेल्या दोन वाळूच्या हायवा वर पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ कार्यवाईचे आदेश दिल्यानंतर चकलांबा पोलिसांनी या एक हायवा आणि एलपी हीला ताब्यात घेतले आहे परंतू या दोन्ही गाड्याची इंन्ट्री चकलांबा स्टेशन डायरीला आहे मात्र एका गाडीच्या चालकांवर गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन याठिकाणी एका न्यायाधिश यांच्या खाजगी वाहनाला कट मारला असता त्यांनी ही माहिती थेट पोलिस अधीक्षकांना दिली तसेच पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेनंतर चकलांबा पोलिस घटनास्तळावर गेले व सदरच्या एलपी व हायवा वर कार्यवाई केली परंतू यामध्ये तातडीने चालक मालक यांच्यावर गू्न्हा दाखल करायला हवा होता परंतू राजकीय दबाब आणून सदरच्या गून्हा दाखल होत नव्हता अशी चर्चा आहे तसेच दूसऱ्या हायवाची नोंद चकलांबा पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीला आहे परंतू यावर अद्याप गून्हा दाखल झालेला नाही तसेच या गाडी मालकांने चकलांबा पोलिस ठाणेदार यांच्यावर राजकीय दबाव आनला असल्याने या एक वाहनावर अद्याप गून्हा दाखल झालेला नाही अशी चर्चा चकलांबा पोलिस ठाण्यातील कर्मचारी दबक्या आवाजात करत आहेत.