
न्यायाधिश यांच्या खाजगी वाहनाला वाळूच्या गाडीने मारला कट
एक हायवा व एल पी वर पोलिसांची कार्यवाई
गेवराई दि 1 ( वार्ताहार ) राक्षसभूवन शनिचे या ठिकाणी आपल्या खाजगी वाहनाने एक न्यायाधिश राक्षसभूवन ला दर्शनासाठी आले होते रस्ता लहान आहे तसेच याठिकाणाहून वाळूने भरून जानाऱ्या दोन वाहनानी त्यांच्या गाडीला कट मारला व त्यांनी सदर घटनेची माहिती बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांना दिली तसेच पोलिस अधीक्षकांनी ह्या दोन्ही वाहनावर कार्यवाईचे आदेश चकलांबा पोलिसांना दिले चकलांबा पोलिसांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत व एक हायवाने पलायन केले आहे ही घटना ( दि 1 जून ) रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षसभूवन परिसरात अवैध वाळूच्या तस्करीने थैमान घातले असताना यापुर्वी देखील एका वाळूच्या गाडीने जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारला होता तसेच आज बाहेर जिल्ह्यातील न्यायाधीश हे राक्षसभूवन शनिचे याठिकाणी देवदर्शनासाठी आले असता त्यांच्याही गाडीला वाळू माफियांनी भरून चाललेल्या गाड्यानी कट मारला सदर बाब ही गंभीर स्वरूपाची आहे न्यायाधीश यांनी ही माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांना दिली तसेच त्यांनी चकलांबा पोलिसांना सदरच्या गाड्यावर कार्यवाई करण्याचे आदेश दिले या तिन वाळूच्या गाड्या होत्या अशी प्राथमिक माहिती आहे परंतू दोनच गाड्या चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती असून या कार्यवाईत अंदाजे साठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.