गेवराई दि 27 ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी बोरगाव जूने या परिसरात असनाऱ्या दोन गटात वाळूच्या कारणा वरून तूफान राडा झाला होता परंतू काल चकलांबा ठाण्यात मुंगी येथील ढाकणे टोळीवर गून्हा दाखल केल्यानंतर आता शेवगाव पोलिस ठाण्यात जाधव टोळीवर देखील गून्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत तसेच बोरगाव परिसरात नगर जिल्ह्यातील तसेच स्थानिक जाधव आणि ढाकणे या दोन मुख्यटोळ्या आहेत आणि ह्या वाळू उपसा करण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत सक्रीय आहेत तसेच बोरगाव या ठिकाणी जो या दोन गटात वाद निर्माण झाला यांचे कारण दोन्ही फिर्यादीने वेगवेगळी दिली आहेत तसेच शेवगाव पोलिसांत दाखल झालेल्या गून्ह्यात तू आमच्या परिसरात शेत जमिन का?घेतली असे म्हणून घरातून उचलून घेऊन जाऊन डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार मारली तसेच गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली अशी फिर्याद शेवगाव पोलिसांत दाखल करण्यात आली असून चौदा लोकांविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनि अमोल पवार हे करत आहेत.