मुंगीच्या ढाकणे टोळीवर चकलांबा पोलिसांत दरोड्याचा गून्हा दाखल
गेवराई दि 26 ( वार्ताहार ) तालूक्यातील बोरगाव परिसरात दहशत निर्माण करूण दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करूण लाखों रूपयाचा मुद्देमाल चोरी करनाऱ्या मुंगी येथील ढाकणे टोळी अवैध वाळू तस्करीत सक्रीय आहेत ( दि 24 मे ) च्या रात्री बोरगाव परिसरात मोठा वाद निर्माण झाला होता या प्रकरणी रात्री उशीरा चकलांबा पोलिसांत ढाकणे टोळीवर दरोड्यासह अन्य कलमान्वे गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,कंदूरीचा कार्यक्रम सुरू असतांना ढाकणे टोळीतील दोघांनी जेवण करत असलेल्या लोकांच्या अंगावर बूलेट घातली तसेच त्या ठिकाणी आपल्या अन्य साथीदार यांना फोनवर बोलावून घेतले व सहा ते सात लोकांना जबर मारहान केली तसेच काहींच्या मोटार सायकल यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून दिल्या असल्याबाबद एकाने चकलांबा पोलिसांत अशी फिर्याद दाखल केली आहे तसेच या प्रकरणी दरोड्यासह अन्य कलमान्वे गूून्हा दाखल करण्यात आला ढाकणे टोळीतील अठरा लोकांचा या गून्ह्यात सहभाग असून पुढील तपास सपोनि गढवे हे करत आहेत.