January 22, 2025

वर्चस्व वादातून वाळू माफियांच्या दोन गटात तूफान राडा

सहा ते सात जण  जखमी;बोरगाव येथील घटना

 

गेवराई दि 25 ( वार्ताहार ) तालूक्यातील बोरगाव परिसरात रात्री अचानक जाधव आणि ढाकणे गटात वाळूच्या कारणावरून तूफान राडा झाल्याची घटना ( 25 मे ) रोजी रात्री घडली असून या घटनेत सहाजन गंभीर जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर बीड व संभाजी नगरच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत बोरगाव बू परिसरात गोदापात्र आहे आणि बोरगाव गेवराई तालुक्याच्या हद्दीत आहे पलीकडे नगर जिल्हा आहे आणि नेहमीच मुंगी येथील वाळू माफिया या परिसरात दहशत माजवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे परंतू याबाबद कधी कूठलीही कार्यवाई झाली नाही याठिकाणा वरूण वाळूच्या कारणा वरून  गावातील जाधव आणि मुंगी येथील ढाकणे गटात वर्चस्ववादातून तूफान हानामारी झाली तसेच या घटनेत सहा जण गंभीर जखमी आहेत तसेच रोडवर मोटार सायकलही जाळण्यात आल्या आहेत सदरचे भांडण हे वाळू माफियाच्या दोन गटात झाले आहे अद्याप तरी या प्रकरणी चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *