भावकीचा वाद विकोपाला चूलत्याने पुतण्याला केले ठार
गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील घटना
गेवराई दि 23 ( वार्ताहार ) तालूक्यातील मानमोडी परिसरात एकाच कूटूंबियात शेतीचा वाद झाला याचे रुपातंर हानामारीत झाला तसेच या घटनेत एकाचा जिव गेला असल्याची माहिती आहे.ही घटना आज ( दि 23 मे ) रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,मयत बापूराव रंगनाथ शेळमकर यांची मानमोडी शिवारात वडीलोपार्जित शेत जमिन आहे तसेच त्यांचे चूलते व चूलत भाऊ यांचीही शेतजमिन बाजूला आहे दोघात एकच बांध आहे याच बांधाच्या कारणावरून आज सकाळी त्यांच्या भावकीत मोठा वाद झाला आणि चूलते आणि चूलत भाऊ यांनी वरील मयताला मारहान केली तसेच त्यांना तात्काळ बीड च्या जिल्हा रूग्णालयात हलवले असता डॉक्टरानी त्यांना मयत घोषित केले आहे या प्रकरणी गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.