January 22, 2025

तुम्हाला एक लाख देतो माझी गाडी सोडा;गाडी सोडली नाही म्हणून पोलिसांच्या अंगावर गाडी घातली

चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील घटना;एक कोटीचा मुद्देमाल जप्त

 

गेवराई दि 22 ( वार्ताहार ) आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत आयपीएस डॉ धिरजकूमार बच्चू यांच्या पथकातील कर्मचारी यांनी तिन अनाधीकृत वाळू उपसा करनाऱ्या हायवा पकडल्या तसेच त्या चकलांबा पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना एक काळ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ आडवी लाऊन माझी गाडी सोडा एक देतो असे म्हणाला व पोलिस कर्मचारी यांच्याशी हूज्जत घालू लागला रस्त्याच्या कडेला पडलेल्या काट्या बाजूला सारण्यासाठी उतरलेल्या पोलिस कर्मचारी यांच्या अंगावर हायवा गाडी घालण्याचा प्रयत्न करूण उमापूरच्या माफियांना गाडी पळवली असल्याची घटना आज ( दि 22 मे ) रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे.तसेच या कार्यवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाई आयपीएस डॉ धिरजकूमार बच्चू यांच्या पथकाने केली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,आयपीएस धिरजकूमार बच्चू यांना एका गूप्त बातमीदाराने माहिती दिली की राक्षसभूवन परिसरातून उमापूर मार्गे नगर जिल्ह्यात वाळूने भरूण हायवा घेऊन जात आहेत त्यानूसार पथकातील तिन पोलिस कर्मचारी खाजगी वाहनाने माजलगाव वरून राक्षसभूवन परिसरात आले राक्षसभूवन ते उममापूर रस्त्यावर एक विना नंबरचा हायवा याला अडविले तसेच त्याला रॉयल्टीची विचारना केली असता चालकाने पावती नाही म्हणून सांगितले तसेच गाडी नंबर सांगण्यास नकार दिला त्यापाठोपाठ दूसऱ्या दोन हायवा आल्या त्यांना ही ताब्यात घेऊन जात असताना मध्येच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आडवी लाऊन माझी गाडी लाऊ नका मी एक लाख रूपये देतो असे म्हणून हूज्जत घालू लागला मात्र पोलिस कर्मचारी कूठल्याही आमिषाला बळी न पडल्याचे लक्षात येताच रस्त्यात बाबळीचे झाडे अडवी लावली ते काढण्यासाठी पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरला याच संधीचा फायदा घेऊन हायवा चालकाने व मालकाने हायवा पोलिस कर्मचारी अंगावर घालून पलायन केले आहे तसेच या चालकांचे नाव शारूख शब्बीर पठाण रा चकलांबा व अहमद भाई असल्याची माहिती असून ज्या पोलिस कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घातली त्यांचे नाव अस्तिककूमार देशमूख असल्याचे समजते तसेच या प्रकरणी चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *