January 22, 2025

चकलांबा पोलिस ठाण्याचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात 

 

गेवराई दि 21 ( वार्ताहार ) मागच्या आठवड्यात जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात १ कोटींच्या लाच मागितल्याप्रकरणी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मंगळवारी (दि.21) आणखी एक पोलीस हवालदार पाच हजारांची लाच घेताना पकडला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चकलांब्यामध्ये सापळा रचून ही कारवाई केली.त्यामुळे पोलीस दलात सुरु असलेल्या लाचखोरीच्या प्रकाराचे पुन्हा एकदा यानिमित्ताने भांडाफोड झाले आहे. 

     जिजाऊ प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी हरिभाऊ खाडे यांनी केलेल्या लाचेच्या मागणीमुळे राज्यात खळबळ उडाली होती.याप्रकरणात पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कारवाई करत निलंबन केले होते.मात्र आरोपी अद्याप फरार असल्याने याच्या चर्चा सुरु असताना आता चकलांबामध्ये पाच हजारांची लाच घेताना हवालदार पकडला आहे.तक्रारदार व त्यांचे चूलते यांच्यात शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी हवालदार मारुती रघुनाथ केदार (वय-35 रा.चकलांबा) याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती.त्यानुसार लाच घेताना केदारला रंगेहात पडकले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,विजयमाला चव्हाण,पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि . छत्रपती संभाजी नगर अमोल धस, श्री.सिंदकर,युवराज हिवाळे,अंमलदार श्री.शिंदे यांचा समावेश होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *