पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडेला अटक करण्यासाठी पाच पथके मागावर
एसीबीचे तिन आणि स्थानिक गून्हे शाखेच्या दोन पथकांचा समावेश
बीड दि 21 ( वार्ताहार ) जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात आरोपी करण्याचा धाक दाखवून एक कोटीची मागणी केलेल्या अर्थिक गून्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या विरूद्ध बीड शहर पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांच्या घराची झडती दरम्यान करोडो रुपयांची रोकडं सोने व चांदीचे मोठे घबाड मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे अद्याप पर्यंत एसीबीला मिळालेला नाही त्यांच्या शोधार्थ पाच पथके कार्यन्वित आहेत तसेच एसीबीचे तिन आणि स्थानिक गून्हे शाखेचे दोन पथके असे पाच पथके वेगवेगळ्या दिशेने व परराज्यात असल्याची माहिती आहे तसेच लवकरच पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांना अटक करण्यात येईल.अशी माहिती एसीबी सुत्रांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात एक कोटी ची मागणी अर्थिक गून्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडेनी केल्यानंतर तिस लाखात यांची तडजोड झाली आणि पहिला हप्ता पाच लाख रूपये स्विकारताना खाजगी ईसम कुनाल जैन याला एसीबीने रंगेहात पकडले ही घटना उघडकीस आल्यानंतर बीड पोलिस दलात खळबळ माजली होती परंतू पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या किरायच्या घरात एक कोटी आणि सोने चांदी तसेच सहा प्रॉप्रटीचे पेपर मिळाल्यानंतर हे प्रकरण आणखी गूंतागूतीचे झाले आहे तसेच खाडे आणि जमादार जाधवर हे दोघेही अद्याप फरारच आहेत या दोघांना अटक केल्यानंतर यात संबंधी आणखी मोठी नावे समोर येणार का?असा तिढा आहे परंतू हरीभाऊ खाडे हा पोलिस निरीक्षक असल्याने त्याला तपासा बद्दल काय?करावे लागत असते हे सर्व माहिती असल्याने तो अद्याप बीड एसीबीला गूंगारा देत आहे तसेच तो परराज्यात असल्याची खात्रीलायक माहिती आहे परंतू पाच पथके त्यांच्या मागावर आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोकशेन मिळत असल्याने त्याला अटक करण्यासाठी तांत्रीक अडचणीचा सामना या पथकाला करावा लागत आहे तसेच पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे व साथीदार जाधवर यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती एसीबी सुत्रांकडून मिळाली असून त्यांना शोधण्यासाठी एसीबीचे तिन आणि स्थानिक गून्हे शाखा बीड यांचे दोन पथके एकूण पाच पथके पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडेच्या शोधात कार्यन्वित आहेत.