खाडेंच्या घरात एक कोटी आणि साडेपाच किलो सोने व चांदी मिळाली
बीड दि 17 ( वार्ताहार ) जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात एक कोटीची लाच मागनाऱ्या अर्थिक गून्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्यावर गून्हा दाखल झाल्यापासून तो फरारच आहे त्याचा शोध एसीबीचे पथके घेत असतांनाच आता पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या घरात झडती दरम्याने एसीबीला मोठे घबाड मिळाले आहे एक कोटी रूपये नगदी आणि साडे पाच किलो सोने व चांदी मिळाळ्याने पुन्हा खळबळ माजली आहे तसेच या प्रकरणी पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे मात्र अद्याप पर्यंत पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे फरारच आहे तो एसीबी च्या पथकाला मिळालेला नाही.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापुर्वी एका गून्ह्यात सहकार्य करतो म्हणून तब्बल एक कोटीची मागणी अर्थिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांनी केली होती तडजोडी अंती ही रक्कम तिस लाख रूपये ऐवढी ठरली पहिला टप्पा म्हणून पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या सांगण्यावरून एका खाजगी व्यक्तीकडे ही रक्कम सोपविताना एसीबीने दोन लोकांना रंगेहात पकडले परंतू पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे त्यादिवशी बाहेरगावी होता तो फरार झाला तसेच बीड येथील बळीराजा कॉम्प्लेक्स येथील चाणक्यपुरी अर्पांरमेंन्टमध्ये एका फ्लॅटमध्ये हरीभाऊ खाडे किरायणे राहत होतो त्या घरावर आधीच एसीबीला संशय होता त्यांनी ते घर सिल केले होते परंतू त्याठिकाणी कूनी राहत नसल्याने काल न्यायालयाची परवानगी घेऊन एसीबीच्या पथकाने घराची झडती घेतली तेव्हा एक कोटी रूपये नगदी आणि साडे पाच किलो सोने व चांदी ची रोकड मिळाल्याने पुन्हा खळबळ माजली आहे एका पोलिस निरीक्षकाच्या घरात ऐवढे मोठे घबाड सापडणे हे बीड जिल्ह्यात प्रथमच आहे हरीभाऊ खाडे यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर या प्रकरणात आरोपी ची संख्या वाढू शकते का?हे पाहणे महत्वाचे ठरेल.तसेच गेवराई पोलिसांत दाखल असलेल्या गून्ह्यात आरोपी फिरत असतांना पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांनी न्यायालयात आरोपी फरार आहे असे दोषारोपपत्र दाखल केले होते तसेच या रॅकेट मध्ये गेवराई आणि बीड मधिल किती अधिकारी यांची ईनव्हॉलमेंट आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.