सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर कडक कार्यवाईच्या एसपींच्या सुचना
सोशल मिडीयावर आता पोलिसांची करडी नजर
बीड दि 16 ( वार्ताहार ) निवडणूक झाल्यापासून अनेक गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट करणे आता महागात पडू शकते कारण आता बीड पोलिस अधिक्षक यांनी सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर कडक कार्यवाईच्या सुचना ठाणे प्रमुखांना देण्यात आल्या असून सायबर सेलची आता सोशल मिडीयावर करडी नजर असनार आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की ,39 बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रीया पार पडली काही ठिकाणी अपवाद वगळता बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली चोख बंदोबस्त तसेच अचूक नियोजनामुळे कूठेही गालबोट लागले नाही जसेच मतदान झाले आणि सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अश्या पोस्ट सुटत होत्या याचा परिणाम म्हणून केज तालुक्यातील नांदूर गावात दगडफेक झाली दोन गटात मोठा वाद निर्माण झाला तसेच यामध्ये तिनजण किरकोळ जखमी झाले या गावात आता तणावपुर्ण शांतता आहे याठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमिवर बीडचे पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी सोशल मिडीयावर वादग्रस्त तसेच अक्षेपार्ह पोस्ट करनाऱ्या विरूद्ध कडक कार्यवाई करण्याच्या सुचना सायबर व बीड जिल्ह्यातील ठाणे प्रमुखाना दिल्या आहेत.तसेच बीड ही संताची भूमि आहे कूणीही सोशल मिडीयाचा दूरयुपयोग करू नका जबाबदारीने वागा प्रशासनाला सहकार्य करा असे अवाहनही पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी केले आहे.