बोंबला विशिष्ट गटाचे बटन दाबा असा अट्टाहास कर्मचारी यांच्यावर कार्यवाई करण्याऐवजी सहा लोकांविरूद्ध चकलांबा पोलिसांत गून्हा
गेवराई दि 14 ( वार्ताहार ) काल दि 13 मे रोजी 39 बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रीया पार पडली काल मतदान सुरू असतांना माटेगाव बूध क्रं 49 व 50 यावर बंदोबस्थासाठी नियूक्त केलेल्या पोलिस कर्मचारी यांनी विशीष्ट गटाचे बटन दाबा असा अट्टाहास केल्याने संतप्त नागरिकांनी यांचा व्हिडीओ शोशल मिडीयावर व्हॉयरल केला जिल्हा प्रशासनाने यावर कार्यवाई करण्याऐवजी स्थानिकच्या पाच ते सहा लोकांविरूद्ध गून्हा दाखल केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत माटेगाव याठिकाणी 39 बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रीया पार पडत होती बाळासाहेब भक्तीदास गर्जे मुळ गाव शिरूर कासार हा पोलिस कर्मचारी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत तसेच लोकसभा निवडणूकीच्या पोलिस बंदोबस्थासाठी बीड येथे नेमणूक करण्यात आली होती तसेच ते चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत येनाऱ्या माटेगाव बूध क्रं 49 व 50 या ठिकाणी कर्तव्यावर होते तसेच त्यांनी लोकसभा उमेदवार यांना मदत होईल असे कृत्य केले व विशीष्ट गटाचे बटन दाबा असा व्हिडीओ शोशल मिडीयावर व्हॉयरल झाला हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून निवडणूक आयोगाने यांची चौकशी करून संबंधीत कर्मचारी यांच्या विरूद्ध कार्यवाई करणे अपेक्षीत होते परंतू यांची कूठलीही चौकशी न करता माटेगाव येथील आज्ञात पाच ते सहा लोकांविरूद्ध गून्हा दाखल केल्याने प्रशासन नेमके कूणाला पाठीशी घालत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे तसेच या सर्व घटनेची चौकशीची मागणी आता होऊ लागली आहे.