एस पी साहेब अवैध वाळू तस्करीमुळे कोणाचा जिव गेला तर चकलांबा आणि तलवाडा ठाणे प्रमुखावर सदोष मनूष्य वधाचा गून्हा दाखल करा
गूंतेगाव,बोरगाव,राक्षसभूवन,
गंगावाडी,काठोडा परिसरात रोडवर मनाई आदेश लागू असतांना वाळू माफियांचे टोकळे ऊभे राहू लागले
गेवराई दि 5 ( वार्ताहार ) वाळू तस्करी बीड जिल्ह्याला लागलेला कलंक आहे त्यातच गेवराई तालूक्यातील तलवाडा आणि चकलांबा पोलिस ठाणेदार याठिकाणी वाळूचा मलिदा लाटण्यासाठीच येतात त्यातच लोकसभा निवडणूकीची आदर्श अचार संहिता लागू असतांना व जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतांना तलवाडा आणि चकलांबा या दोन पोलिस ठाणे हद्दीत प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सूरू आहे तसेच या ठिकाणच्या गोदापात्राच्या रस्त्याला वाळू माफियांचे टोळके ऊभे असते येनाऱ्या जानाऱ्या नागरिकांना यांचा नाहक त्रास होतो आणि यातून अपघात होण्याची दाट शक्यता असते असे जर झाले तर वाळू माफियावर नाही तर तलवाडा आणि चकलांबा या दोन्ही ठाणेदारावर सदोष मनुष्यवधाचा गून्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड जिल्ह्यात चकलांबा आणि तलवाडा हे ठाणे याचे कार्यक्षेत्रात गोदाकाठचा परिसर मोठ्या प्रमाणात येतो तलवाडा,हद्दीत,राजापूर,गंगावाडी,भोगलगाव,काठोडा,या भागातून तर चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत राक्षसभूवन,गूळज,पाथरवाला,बोरगाव,ही गोदाकाठची गावे येतात याठिकाणी सध्या आदर्श अचार संहिता सुरू आहे तसेच बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतांना वरिल ठिकाणच्या गावातील चौकामध्ये रात्री आठ च्या नंतर सामान्य नागरिक यांचे वागणे कठीण असते टोळके ची टोळके दारूच्या नशेत आडव्या गाड्या लाऊन उभे असतात यांना ऐवढी हिमंत येते कूठूण याचं आत्मपरिक्षण पोलिस अधीक्षक यांनी करावे तसेच गेवराई उप विभागीय पोलिस अधीकारी नूसते नावालाच आहेत यांचा या दोन्ही ठाणेदार यांच्यावर अंकूश नाही तसेच हा सगळा प्रकार त्यांना विश्वासात घेऊन तर सुरू नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे तसेच उपविभागीय अधीकारी यांनी नेमणूक केलेले भरारी पथक कूठे?आहे या पथकातील कर्मचारी कोण?आहेत यांची पार्श्वभूमी देखील तपासणे आवश्यक आहे वरील ठिकाणी जर आता यापुढे अपघात झाला तर ठाणे प्रमूखावर सदोष मनूष्य वधाचा गून्हा दाखल करावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.तसेच या दोन्ही ठाणेदारामुळे कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो वेळीच यांना यांची जाणिव करून देणे आवश्यक आहे नाहीत अनर्थ अटळ आहे.