January 22, 2025

खामगाव चेकपोस्टवर एक कोटी रूपये पकडले

 

गेवराई दि 4 ( वार्ताहार ) सध्या लोकसभा निवडणूकीच्या अंनूषगाने प्रषासन अलर्ट मोडवर आहे तसेच आज ( दि 4 मे ) रोजी गेवराई तालूक्यातील खामगांव चेकपोस्टवर एका ईनोव्हा गाडीत एक कोटी रूपये रोख मिळाले असल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालूक्यातील खामगांव चेक पोस्टवर तपासणी करत असताना एम एच 23 एडी 0366 ईनोव्हा या कार मध्ये पैश्याची लोंखडी पेटी असून त्यामध्ये एक कोटी रूपये मिळून आले आहेत सदर चालकांशी विचारपूस केली असता त्याने ही रक्कम व्दारकादास मंत्री बँकेची आहे असे सांगितले परंतू तसेच ही रक्कम संभाजी नगर शाखेतून बीड शाखेत घेऊन चाललो आहे तसेच ई एस एम एस आणि निवडणूक आयोगाचे बारकोर्ड नसल्या कारणाने पंचासमक्ष ही रक्कम साहय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार संदीप खोमणे यांच्या ताब्यात दिली आहे तसेच सदर रक्कमेची व चालकाची चौकशी सूरू असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार संदीप खोमणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *