गेवराई दि 2 ( वार्ताहार ) गेवराई दूय्यम निबंधक कार्यलयाचे प्रमुख रजिस्टार गोपेवाड यांची आज( दि 2 मे ) रोजी कार्यलयातच तब्येत बिघडली त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच त्यांचा बीपी लो झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,दूय्यम निबंधक कार्यलयात दररोज प्रमाणे अनेक नागरिक याठिकाणी जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी येतात आज कार्यलयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती तसेच तसेच उन्हाचे तापमानही चाळीसी पार होते यातच दूपारी कामकाज सुरू असतानांच अचानक रजिस्ट्रार गोपेवाड यांंची प्रकृती बिघडली तसेच त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते त्यांची तपासणी केली असता त्यांचा बीपी लो झाला असल्याची माहिती डॉक्टरानी दिली असून आज दूपार नंतर दूय्यम निबंधक कार्यलयाचे कामकाज बंद झाले होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...